पाचडमधला समाधी ठिकाणचा जिजाबाईंचा पुतळा चोरीला

September 14, 2009 10:33 AM0 commentsViews: 89

14 सप्टेंबर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड इथल्या जिजाऊंच्या समाधी स्थळावरून जिजाऊंचा पंचधातूचा पुतळा चोरीला गेला आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. गावकर्‍यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी तातडीनं प्रशासनाला कळवलं. दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून पाचाड आणि रायगड परिसरातील दुकानं आणि हॉटेल्स सोमवारी बंद ठेवण्यात आली आहेत. महाडमध्ये नागरिकांनी निषेधाचे बॅनर्सही लावलेत. पाचाडच्या या समाधीस्थळी पुतळ्याच्या ठिकाणी सध्या जिजाऊंचा फोटो ठेवण्यात आला आहे. प्रांताधिकारी भाऊसाहेब पटांगरे, तहसिलदार सुरेश सोनावणे, महाड तालुका पीआय विकास गावडे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खोळे यांच्या उपस्थितीत या फोटोची पूजा करण्यात आली.

close