एआयबी नॉक’आऊट’, 14 जणांविरोधात होणार गुन्हे दाखल

February 12, 2015 5:08 PM0 commentsViews:

aib knockout4412 फेब्रुवारी : अश्लीलतेचा कळस गाठलेल्या वादग्रस्त  ‘एआयबी नॉकआऊट’ कार्यक्रमाविरोधात हायकोर्टाने कडक पाऊलं उचलली आहे. या शोविरोधात 14 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. यामध्ये दिग्दर्शक करण जोहर, रणवीरसिंग अर्जुन कपूर आणि दिपीका पदुकोण यांचा समावेश आहे. या प्रकरणी ऍडव्होकेट आभा सिंग यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी झाली.

मागील वर्षी 20 डिसेंबर रोजी वरळीत हा एआयबीचा शो बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या उपस्थिती पार पडला होता. महिनाभरानंतर संपूर्ण कार्यक्रम युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करण जोहर याने केले होतं. तर रोस्ट म्हणून अभिनेता रणविर सिंग आणि अर्जुन कपूर आमनेसामने होते. या कार्यक्रमात अश्लील आणि बिभत्सपणे एकमेकांवर टीका करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भटही सहभागी होत्या. एआयबीच्या या बिभत्स शो विरोधात मनसे, राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली होती. आणि देशवासियांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. सर्वपक्षीय तीव्र विरोधानंतर युट्यूबवरून हा शो काढून टाकण्यात आलाय. आता या प्रकरणी करण जोहर, रणवीरसिंग अर्जुन कपूर आणि दिपीका पदुकोण यांचासह 14 जणांविरोधात हायकोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close