महाराष्ट्र बँक फसवणूक प्रकरणी सीबीआयचं मराठवाड्यात धाडसत्र

February 12, 2015 6:05 PM0 commentsViews:

maha bank412 फेब्रुवारी : महाराष्ट्र बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी मराठवाड्यात ठिकाणी सीबीआयने धाडसत्र हाती घेतलंय. सीबीआयच्या अधिकार्‍यांनी नाशिक,औरंगाबाद,बीड, नांदेड आणि परभणी इथं छापे टाकले आहे. छाप्यांमध्ये काही कागपत्र आणि काम्प्युटरच्या हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या आहेत. अद्याप क ोणालाही अटक कऱण्यात आलेली नाही.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँकेची जवळपास 56 कोटींची लूट करण्यात आलीय. कर्ज तारण प्रकरणी खोटे कागदपत्रं दाखल करून जमिनीच्या किमती कमी असतांना त्या जास्त दाखवण्यात आल्या. या प्रकरणात बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक ए.एम.राजे आणि मूल्यांकन अधिकारी मिलिंद सांगवीकर यांचा समावेश आहे. दरम्यान, तसंच बँक ऑफ महाराष्ट्रनं केलेल्या तक्रारीप्रमाणे एफआयआर दाखल करण्यात आलाय. त्यात 17 जणांचा समावेश आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे तत्कालीन अधिकारी आणि बिल्डर्सवर यांचा या एफआयआरमध्ये समावेश आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close