नॉर्मन बोरलॉग यांच निधन

September 14, 2009 10:54 AM0 commentsViews: 3

14 सप्टेंबर भूकबळीच्या दाढेतून अब्जावधींना वाचवणारे हरित-क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग यांचं अमेरिकेतल्या डलासमधल्या राहत्या घरी कॅन्सरनं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. शेतात राबणारा कृषीशास्त्रज्ञ अशी ओळख असलेल्या नॉर्मन यांना त्यांच्या कार्याबद्दल नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. आधुनिक आणि पारंपरिक शेतीची सांगड घालत नॉर्मन यांनी अनेक शोध लावले होते. त्यामुळेच जगभरात गव्हाच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाली. विशेषत: भारतातल्या हरित क्रांतीला त्यातूनच जोरदार चालना मिळाली. भारत सरकारने त्यांना 2006 मध्ये पद्मविभूषण देऊन गौरवलं होतं.

close