डहाणू विनयभंग प्रकरण : पीडित विद्यार्थिनीवर कॉलेज प्रशासनाकडून दबाव

February 12, 2015 9:02 PM0 commentsViews:

dahanu case12 फेब्रुवारी : डहाणू विनयभंग प्रकरणी आता तक्रार केलेल्या विद्यार्थिनींवर कॉलेज प्रशासनाकडूनच दबाव टाकला जात आहे. प्राध्यापकानेच अश्लिल चाळे केल्याप्रकरणी एसआरके वडकून कॉलेजच्या विद्यार्थिनींनी तक्रार केली होती. पण अशा प्रकारची तक्रार का केली असा सवाल करत कॉलेज प्रशासनाकडून या विद्यार्थिनींवर दबाव येतोय. त्यामुळे या विद्यार्थिनींमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालंय.

डहाणूमध्ये एसआरके वडकून कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानंच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. मधुकर झांबरे असं या विनयभंग करणार्‍या प्राध्यापकाचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनीला आपल्या स्टाफ रूममध्ये बोलावून तिच्याशी त्यानं अश्लील वर्तन केलंय. या विद्यार्थीनेने तक्रार केल्यानंतर डहाणू पोलिसांनी या शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे कॉलेजची बदनामी होत असल्यामुळे कॉलेज प्रशासनाने या मुलीवर दबाव टाकत आहे. त्यामुळे जोपर्यंत प्राध्यापक झांबरे यांच्यावरती कार्यवाही केली जात नाही तोपर्यंत उद्या दिनांक 13 रोजी कॉलेजच्या सर्व मुली गेटसमोर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close