तीस्ता सेटलवाड यांची अटक उद्यापर्यंत टळली

February 12, 2015 9:22 PM0 commentsViews:

teesta setalvad412 फेब्रुवारी : गुजरात दंगल पीडितांसाठीच्या मदत निधी गैरव्यवहार प्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना दिलासा मिळालाय. सेटलवाड यांच्या अटकेला उद्यापर्यंत सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलीये. तीस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज गुजरात हायकोर्टाने फेटाळला होता. या प्रकरणी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने त्यांना उद्यापर्यंत दिलासा दिलाय.

गुजरामध्ये 2002 च्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांचं स्मारक उभारण्यासाठी सेटलवाड यांनी निधी जमा केला होता. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सेटलवाड यांच्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणी सेटलवाड यांचा जामीन अर्ज गुजरात हायकोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे सेटलवाड यांच्या अटकेची शक्यता होता. परंतु, सेडलवाड यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णायाला स्थगिती देऊन सेटलवाड यांना दिलासा दिला. पण उद्या शुक्रवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी करण्याचे आदेशही दिले आहे. दरम्यान, सेटलवाड यांच्या मुंबईतील जुहू इथल्या घराची गुजरात क्राईम ब्रँचनं आज झडती घेतली. झडती सुरू असतांना सेटलवाड मात्र घरी नव्हत्या. त्यानंतर ही कारवाई सुरू झाली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close