काँगेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाबाबत निर्णय लांबणीवर

September 14, 2009 12:58 PM0 commentsViews: 1

14 सप्टेंबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार हे निश्चित झालं आहे. त्याच संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची लवकरचं दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आण राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गेले काही दिवस गुप्त चर्चा सुरू होत्या. त्यात 'राष्ट्रवादीने' गेल्या विधानसभेच्या तुलनेत कमी जागा स्वीकारायला तत्वत: मान्यता दिली आहे. पण, अजुनही 7 ते 8 जागांच्या बाबतीत एकमत होऊ शकलेलं नाही. असं असलं तरी दोन्हीही पक्ष लवकर निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोनिया गांधी सोमवारी मुंबईत असल्याने तसेचं काँग्रेसचे मोठे नेते दोन दिवस दिल्लीत नसल्याने आघाडीबाबत चर्चा होणं शक्य नाही. येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेस नेत्यांशी चर्चा शक्य नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हंटलं आहे.

close