आदित्य ठाकरे राजकारणाच्या उंबरठ्यावर

September 14, 2009 1:05 PM0 commentsViews: 66

14 सप्टेंबर शिवसेना गटप्रमुखांच्या रविवारी मुंबईतल्या गोरेगाव येथे झालेल्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी लावलेली हजेरी हा चर्चेचा विषय ठरला. उध्दव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जाहीर व्यासपीठावरची आदीत्यची ही पहिलीच उपस्थिती होती. त्यामुळे आदित्य ठाकरे आता राजकारणात सक्रिय होत असल्याची चर्चा आहे. याआधी आबीएन-लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आदित्यने राजकारणात उतरण्याचे संकेत दिले होते. मात्र नेमकं केव्हा राजकारणात उतरणार हे स्पष्ट केलं नव्हतं. मनसेच्या युवा ब्रिगेडला आव्हान देण्यासाठी आदित्य महत्वाची भूमिका बजावणार आहे.

close