संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनं केली सासूची हत्या

February 12, 2015 11:33 PM0 commentsViews:

nashik sasu sun12 फेब्रुवारी : सासू आणि सुनेचं भांडणं प्रत्येक घरात पाहण्यास मिळत पण सासू-सुनेच्या या नात्याला हादरा देणारी घटना नाशिकमध्ये घडलीये. मालमत्तेच्या हव्यासापोटी सुनेनंच आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आलीये. याप्रकरणी सून एकता शर्मा हिच्यासह तिघांना अटक करण्यात आलीय.

मागील आठवड्यात शुक्रवारी सून एकता शर्मा हीने नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये आपली सासू शांतीदेवी शर्मा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. 6 तारखेच्या दुपारी एक गाडी आली आणि त्यातले लोकं घरातून बेडशीटमध्ये काहीतरी गुंडाळून घेऊन गेले, एवढी माहिती देऊन सून एकता शर्मानं सासू बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी आपली तपासचक्र फिरवली. तपासादरम्यान धक्कादायक माहिती पुढे आली. सासूच्या मालमत्तेसाठी सूनेनेच्या बहिणीचा नवरा अशोक शर्मा आणि इतर दोघांच्या मदतीने सासूची हत्या केली. या दोघांनी सासूचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून तो माळशेज घाटात फेकून दिला. या सर्व आरोपींना अटक करण्यात आलीये. या घटनेनंतर पोलिसांनी सून एकता शर्मा तसंच आरोपी अशोक शर्मा आणि त्याच्या दोन साथीदाराना मुंबईहून गाड़ी समवेत अटक केलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close