जम्मू आणि काश्मीरमध्ये लवकरचं सरकार स्थापन होण्याची शक्यता

February 13, 2015 9:40 AM0 commentsViews:

PDP AND BJP

13 फेब्रुवारी : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत सर्वांत अधिक जागा मिळविणार्‍या पीडीपी आणि भाजप यांच्यात अखेर सत्ता स्थापनेसाठी तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही पक्षांमधील चर्चा आता अखेरच्या टप्प्यात आली असून पीडीपीचे नेते मुफ्ती महंमद सईद हे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर या आघाडीची औपचरिक घोषणा होईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

पीडीपी आणि भाजपमध्ये 23 फेब्रुवारीपूर्वी सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तसेच, राज्याचे मुख्यमंत्रिपद पीडीपीकडे जाणार असून, उपमुख्यमंत्रिपद भाजपला मिळणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. मुफ्ती महंमद सईद यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून निर्मल सिंग यांचे नाव चर्चेत आहे. पीडीपी आणि भाजपचा समान कार्यक्रम ठरवण्यासाठी ते येत्या तीन दिवसांत नवी दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. या वेळी कलम 370, मुद्यावर भाजपनं आपली ताठर भूमिका सोडली तर पीडिपीनंही अनेक मुद्यांवर तडजोड केली आहे..

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close