राज ठाकरेंनी पूर्णवेळ व्यंगचित्रकार व्हावं, आशिष शेलारांची टीका

February 13, 2015 1:20 PM0 commentsViews:

Ashish shelar and raj

13 फेब्रुवारी : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या पराभवानंतर राज ठाकरेंनी कार्टूनमधून मोदी सरकारवर टिपणी केली होती. त्यावर शेलारांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं आहे.

‘राज ठाकरेंना प्रकाशझोतात येण्याचा नवा मार्ग सापडलेला दिसतोय, त्यांच्या व्यंगचित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राज ठाकरेंनी हा पूर्णवेळ व्यवसाय निवडायला हवा,’ असा टोला शेलार यांनी लगावला आहे.

दिल्लीच्या पराभवानंतर राज ठाकरेंनी कार्टूनमधून मोदींवर निशाणा साधला होता. मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरेंनी दिल्ली निवडणुकीच्या निकालावर व्यंगचित्र काढूत भाजपला चिमटा काढला आहे. राज यांनी व्यंगचित्रात मोदी आणि शहा भाजपच्या ट्विन्स टॉवरसारख्या मोठ्या इमारती दाखवल्या असून केजरीवालांच्या विमानाने दोन्ही इमारतींना भगदाड पाडल्याचं व्यंगचित्र रेखाटले आहे तर ओबामा, दिल्लीतील भाजपचा दारुण झालेला पराभव टीव्हीवर पाहत आहेत. ओबामांचा वापर करून दिल्ली निवडणुकांत मोदींनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्यांचा दारुण पराभव झाला असं या व्यंगचित्रात साकारलेलं आहे. त्याला आज आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close