जनता आपल्याच पाठीशी असल्याच्या अहंकारात राहू नका – शिवसेना

February 13, 2015 12:08 PM0 commentsViews:

Uddhav modi

13 फेब्रुवारी :  ‘जनता आपल्या पाठीशी असल्याच्या अहंकारातून सगळ्यांनीच बाहेर यावं, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला लक्ष्य केलं आहे.

देशात कधी कसली लाट येईल आणि त्या लाटेत कोण वाहून जाईल ते सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणातील हिरोंनी प्रत्येक पाऊल जपून टाकावं, अशी बोचरी टीकाही सामनातून केली आहे.

सेवक सगळेच आहेत, मात्र सेवकपणाचा अतिरेक करु नका. जनता हीच जनार्दन असून जनता पाठिशी आहे या अहंकारातून सर्वांनीच बाहेर पडावे असा उपदेशाचा डोसही उद्धव ठाकरेंनी भाजपा नेतृत्वाला पाजला आहे.

ओबामा दिल्लीत आले तेव्हा नरेंद्र मोदींनी 30 – 35 लाख रुपयांचा कोट घातल्याची चर्चा होती. आता अरविंद केजरीवाल यांचा मफलरही ब्रँडेड होऊ नये असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close