मावळकरांचा 20 कोटींचा व्हॅलेंटाईन

February 13, 2015 3:25 PM0 commentsViews:

13 फेब्रुवारी : यंदाचा व्हॅलेंटाईन डे प्रेमात पडलेल्यांबरोबरच आणखीही कुणासाठी तरी स्पेशल आहे. तब्बल 20 कोटींच्या गुलाबांची संपूर्ण देशभरात निर्यात झाल्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन मावळ तालुक्यातील गुलाब उत्पादकांसाठी खूपच स्पेशल ठरतोये.

प्रेमाचा दिवस स्पेशल ठरवणारा हा गुलाब नाशवंत आहे आणि म्हणूनच त्याचा ताजेपणा जास्त काळ टिकून रहावा, यासाठी या उत्पादकांनी विशेष काळजी घेतली. त्यामुळेच खास या दिवसासाठी गुलाबाची शेती करण्यासाठी इथल्या तरूण उद्योजकांनी उत्साहानं पुढाकार घेतला. यात त्यांना यशही आलं आणि बहरली या स्पेशल गुलाबांची शेती…  रंग, आकार, त्याचं रूप सगळंच न्यारं असलेला हा गुलाब आता मावळमधून सगळ्या देशात प्रेमाचा संदेश घेऊन निघाला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close