अँटी करप्शनच्या फाईली खडसेंना का हव्यात ?-राठोड

February 13, 2015 4:12 PM0 commentsViews:

rathod on khadse313 फेब्रुवारी : महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यातला वाद चिघळलाय. संजय राठोड यांनी आज उघडपणे एकनाथ खडसेंवर आरोप केले आहे. अँटी करप्शनचे प्रकरणं खडसेंना स्वत:कडे का हवेत का ?, असा सवाल संजय राठोड यांनी विचारलाय.

तसंच एकनाथ खडसेंकडे कुठलही प्रकरण मागितलं नाही. असा खुलासाही राठोड यांनी केलाय.

शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा संजय राठोड यांनी केलाय. राज्यमंत्र्यांना घटनात्मक अधिकार मिळावेत अशी मागणीही त्यांनी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close