सचिन तेडुंलकरची 44 वी सेंन्च्युरी

September 14, 2009 1:11 PM0 commentsViews: 1

14 सप्टेंबर वन डे क्रिकेट मध्ये सचिन तेडुंलकरने44 वी सेंच्युरी ठोकली आहे. 92 बॉल मध्ये सचिनने 8 फोरसह ही सेंच्युरी पूर्ण केली. 428 वी वन डे खेळणार्‍या सचिननं जवळपास 45च्या ऍव्हरेजने 16 हजार आठशेहून अधिक रन्स केले आहेत. वन डेतला त्याचा हा हायेस्ट स्कोर आहे. सर्वाधिक रन्स आणि सर्वाधिक सेंच्युरी ठोकणारा क्रिकेट जगतातील तो एकमेव बॅटसमन आहे. कॉम्पॅक कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांनी टीमला 95 रन्सची ओपनिंग करुन दिली. थुशारा, मलिंगा आणि मेंडिसच्या या श्रीलंकेच्या यशस्वी बॉलर्सची त्याने पिटाई केली. सोमवारच्या सेंच्युरी बरोबरच श्रीलंकेत हजार वन ड रन्सही त्याने पूर्ण केले. दुसर्‍या बाजूने द्रविडही नेहमीपेक्षा आक्रमक खेळत होता. ही जोडी सेंच्युरी ओपनिंग करणार असं वाटत असतानाच द्रविड 39 रन्सवर आऊट झाला. जयसूर्याच्या बॉलिंगवर त्याने दिलशानकडे कॅच दिला.

close