‘अब तक छप्पन 2′ ची पहिली झलक

February 13, 2015 6:06 PM0 commentsViews:

बॉलिवूड अभिनेता ऍक्शन हिरो नाना पाटेकरच्या ‘अब तक छप्पन-2′ नं या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यात नाना पुन्हा एकदा धडाकेबाज पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत आहे. 2004 मध्ये रिलीज झालेल्या ‘अब तक छप्पन’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. चित्रपटात नाना एकूण 57 एन्काऊंटर करताना दिसणार आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट संधू आगाशेच्या भुमिकेत ऍक्शन हिरो साकारताना नानांचे वजनदार डायलॉगही प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. ऍक्शन आणि डायलॉग्जनी भरलेल्या या चित्रपटात नाना खूपच फिट आणि एनर्जेटिक दिसत आहे. हा चित्रपट 27 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासह अभिनेत्री गुल पनाग, विक्रम गोखले देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close