अन् शिक्षणमंत्र्यांनी मोजलं दप्तराचं वजन

February 13, 2015 6:14 PM0 commentsViews:

tawade in school 44मुंबई (13 फेब्रुवारी) : शिक्षणाच्या ओझ्याखाली दबलेले विद्यार्थी अन् त्यांच्या पाठीवर वह्या आणि पुस्तकांनी भरलेलं दफ्तर हे चित्र रोजचं. पण शिक्षणाचा नावाखाला दफ्तराचं ओझंच अधिक वाढत आहे. यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी खुद्ध शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचं वजन केलं.

विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनाचा मुद्दा सरकारनं गांभीर्यानं घेतलाय असं दिसतंय. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज (शुक्रवारी) मुंबईतल्या विलेपार्ले भागात असलेल्या पार्ले-टिळक विद्यालय आणि पार्ले म्युनिसिपल स्कूलला भेट दिली. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन आणि विद्यार्थ्यांचं वजन या दोघांच्या वजनाची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. आमच्या दप्तराचं वजन कमी झालं पाहिजे, असं साकडं अनेक विद्यार्थ्यांनी तावडे सरांना घातलं. विद्यार्थ्यांचं वजन 24 किलो आणि त्याच्या दप्तराचं 6 किलो, असं या पाहणीत अनेक वेळा दिसून आलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close