सोनियांनी टाळला आघाडीचा उल्लेख

September 14, 2009 1:51 PM0 commentsViews:

14 सप्टेंबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी मंुबईत काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. राजीव गांधी भवन असं या कार्यालयाचं नाव आहे. उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात सोनियांनी काँग्रेसचा संकल्प थोडक्यात सांगितला. पण भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा साधा उल्लेखही केला नाही. सोनिया आपल्या भाषणात आघाडीबाबत भूमिका स्पष्ट करतील, अशी चर्चा होती. पण सोनियांनी भाषणात राष्ट्रवादीकडे दुर्लक्ष केलं. या बैठकीला मुख्यमंत्री अशोक चव्हाण,माणिकराव ठाकरे, नारायण राणे, कृपाशंकर सिंग उपस्थित होते.

close