व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात युवासेनेचा नागपुरात राडा

February 13, 2015 10:08 PM1 commentViews:

nag valentine sena bajrang dalनागपूर (13 फेब्रुवारी ) : उद्या जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल. पण व्हेलेंटाईन डेला विरोधात पुन्हा एकदा शिवसेना आणि बजरंग दल रस्त्यावर उतरले आहे. नागपुरात युवा सेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घालत प्रेमीयुगुलांना पिटाळून लावले. यावेळी कार्यकर्त्यांनी मुलींशी असभ्यवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकारही घडलाय.

युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी फुटाळा आणि अंबाझरी या परिसरात प्रेमी युगुलांना अडवून मुलींशी असभ्य वर्तन करण्याचा संतापजनक प्रकार घडलाय. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘आवाज कुणाचा…शिवसेनेचा’ घोषणाबाजी करत अंबाझरी या परिसरात धुमाकूळ घातला. प्रेमीयुगुलांना इथून पिटाळून लावले. एवढंच नाहीतर मुलींनी बांधलेले स्कार्फही काढण्यापर्यंत मजल मारली. दिवसभरात नागपुरात फुटाळा आणि अंबाझरी परिसरासह उद्यानं, तलाव परिसरात युवासेनेच्या कार्यकर्त्यांचे थव्वेच्या थव्वे हैदोस घालत होते. युवासेनेच्या कार्यकर्त्यांपाठोपाठ बजरंग दलानंही व्हलेंटाईन डे ला विरोध करण्यासाठी मोठी रॅली काढली. नागपूरमध्ये बोटॅनिकल गार्डन आणि अंबाझरी उद्यानात बसलेल्या जोडप्यांना कार्यकर्त्यांनी धमकावलं. एवढंच नव्हे तर कार्यकर्त्यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप काही मुलींनी केलाय.  आयबीएन लोकमतनेही ही बातमी दाखवताच शिवसेनेनं या प्रकरणातून हात छटकले आहे. नागपुरात झालेल्या प्रकाराशी शिवसेनेचा काहीच संबध नाही., अशी अधिकृत प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय. नागपुरात गेल्या 11 वर्षांपासून भारतीय विद्यार्थी सेनेची कार्यकारिणीच अस्तित्वात नाही, असं शिवसेनेचं म्हणणं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aditya

    केशर पक्ष बहुतांश आहे कारण आता हे होईल

close