गुजरातमध्ये पोटनिवडणुकीत पुन्हा भाजपचं वर्चस्व

September 14, 2009 2:33 PM0 commentsViews: 1

14 सप्टेंबर गुजरातमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 7 मतदारसंघांपैकी भाजपने 5 तर काँग्रेसनं 2 जागा जिंकल्या आहेत. गेल्या लोकसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपनं खूपच खराब कामगिरी केली होती. त्यामुळे आताचा हा विजय मोदींना दिलासा देणारा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत आपल्याच राज्यात धक्का बसला होता. त्याच मोदींनी आता राज्यातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवलाय.

close