…आणि अमित ठाकरेंनी सो़डले झाडावर कीडे !

February 14, 2015 9:51 AM0 commentsViews:

amit thackarey_ tre4414 फेब्रुवारी : मुंबईतील रेन ट्री वाचवण्यासाठी राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे सरसावले. बंगळुरूहुन मागवलेल्या लेडीबग कीटकांची फवारणी करून शिवाजी पार्कमध्ये या प्रयोगाची सुरुवात केली.

मुंबईत ‘रेन ट्री’ला वाचवण्यासाठी मनसेने खास बंगळुरूहुन लेडीबग नावाचे किटक आणले आहेत. हे किटक सुर्योदयापूर्वी झाडाला लागलेली कीड खाऊन टाकतात आणि झाडे सुरक्षित करतात. शिवाजी पार्क वर 8-10 झाडांना कीड लागली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी पालिका आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना याबद्दल सांगितलं होतं. झाडे वाचवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील यावर चर्चा केली. आयुक्तांच्या परवानगीने यातील सर्वोत्तम पर्याय निवडून हा प्रयोग करण्यात आला. मनसेनं 2-3 दिवसांचा वेळ घेऊन कुरीअरने हे किटक मागवून घेतले आणि त्यांना विशिष्ठ तापमानात ठेवले होते. जर यांना उष्णता लागली तर ते संपण्याची भीती असते म्हणून आज सुर्योदयापूर्वी या किटकांना झाडांवर सोडण्यात आलं. जेणेकरून हे लेडीबग कीटक झाडांची कीड खाऊन टाकतील आणि झाडे सुरक्षित होतील.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close