मोदींचा बारामती दौरा – दिवसभरातील अपडेट्स

February 14, 2015 2:00 PM0 commentsViews:

modi in baramati

मोदींसाठी मराठमोठी मेनू

भिगवणे इथल्या मेळाव्यानंतर शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाकरी, चपाती, पिठलं, वांग्याची भाजी, मेथीची भाजी, गव्हाची खीर असा बेत आखण्यात आला होता.यावेळी प्रफुल्ल पटेल,अजित पवार सुप्रिया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट, एकनाथ खडसे, राधामोहन सिंग, राज्यपाल विद्यासागर राव हेही उपस्थित होते.

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

- आज मीडियासाठी विशेष दिवस आहे, मोदी पहिले काय बोलले होते आणि आता काय बोलले -नरेंद्र मोदी
- लोकतंत्रची हीच खासियत आहे आणि ती त्याची ब्युटी आहे
- लोकतंत्र विवाद आणि संवाद या दोंघावर चालतो
- बारामतीच्या शेतकर्‍यांमध्ये मती आहे आणि गती आहे, जिथे मती आणि गती असते तिथे प्रगती असते -नरेंद्र मोदी
- शेतकर्‍यांसाठी नेहमीच विचार करणारे शरद पवार – नरेंद्र मोदी
- गेल्या 10 वर्षात जी कामं अपुरी राहिले आहे, ती मलाच करावी लागणार आहेत -नरेंद्र मोदी
- आम्ही राजकारणात आहोत पण आमच्यासाठी राष्ट्रनीती महत्वाची असते -नरेंद्र मोदी
- पण आम्ही वेगळ्या पक्षाचे लोक एकत्र आलो की का मोठ्‌या बातम्या बनतात हेच मला कळत नाही -नरेंद्र मोदी
- मला शरद पवारांचे अनुभव घ्यायला हवेत. त्यांचे विचार घ्यायला हवेत कारण ते खूप अनुभवी राजकारणी आहेत -नरेंद्र मोदी
- त्यांचे महत्व जास्त आहे त्यांना म्हणून मी गुजरातला बोलावलं होतं -नरेंद्र मोदी
- शरद पवार आणि माझं महिन्यातून दोन ते तीन वेळा बोलणं होतं. -नरेंद्र मोदी
- गुजरातमध्ये मला काही अडचणी आल्या तर मी शरद पवार यांचे विचार घ्यायचो -नरेंद्र मोदी
- आणि आज बारामतीत त्याबद्दल त्यांचं जाहीर अभिनंदन करतो -नरेंद्र मोदी 

=================================================================================

शरद पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

- दुष्काळी भागातील जनतेला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे -शरद पवार
– शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे -शरद पवार
– धनगर समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे, पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावं -शरद पवार
– पण धनगरांना आरक्षण मिळायला हवं- शरद पवार
– मुख्यमंत्री, राज्य सरकार दुष्काळ निवारणासाठी, शेतकर्‌यांच्या प्रश्नांसाठी प्रयत्न करतायत -शरद पवार
– पण केंद्रीय कृषीमंत्र्यांनी पण लक्ष घातलं पाहिजे -शरद पवार
– ऊस उत्पादक शेतकर्‍यांची स्थिती अतिशय वाईट आहे -शरद पवार
– शेती ,पशुधन वाचवण्याचा आमचा प्रयत्न- शरद पवार
– साखर निर्यातीचा निर्णय लवकर घ्यावा शरद पवार
– शेतकर्‍याना दिलासा मिळेल – शरद पवार 

====================================================================================14 कसा असेल मोदींचा दौरा ?

14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती विमानतळावर हेलिकॉप्टरनं येतील. त्यानंतर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाची पाहणी करून याच संकुलात उभारलेल्या सीबीएसई माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करतील. तेथून भिगवण रस्त्याने शारदानगर शैक्षणिक संकुलातील अप्पासाहेब सभागृहाचे उद्घाटन करतील.तेथून कृषी विज्ञान केंद्रातील विविध संशोधन प्रकल्प, शेतीपूरक उपक्रमांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर केंद्र शासनाच्या मदतीने उभारण्यात येणार्‍या सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर व्हेजिटेबल प्रोडक्ट्स या नियोजीत इमारतीचे भूमिपूजन करतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता याच संकुलात होणार्‍या शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग हेही मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यानंतर शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी स्नेहभोजन उरकून मोदी हेलिकॉप्टरने पुण्याला रवाना होतील.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close