‘ती’ बनली एका दिवसाची पोलीस इन्स्पेक्टर !

February 14, 2015 11:26 AM0 commentsViews:

14 फेब्रुवारी : ‘मला मोठं झाल्यावर पोलीस व्हायचं’ असं बाल स्वप्न सर्वंच जण पाहत असतात पण एका चिमुरडीचं स्वप्न सत्यात उतरलंय. भोईवाडा मुंबई पोलिसांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एक वेगळाच आदर्श घातला. पोलिसांनी ‘मेक अ विश फाऊंडेशन’च्या मदतीनं सात वर्षाच्या कॅन्सर पेशंट महेक सिंग या मुलीला पोलीस इन्स्पेक्टर बनवून तिला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्टच दिलं.mahek433

महेक सिंगला एक दिवस भोईवाडा पोलीस स्टेशनची इन्चार्ज बनवलं आणि तिला सलामी दिली. पोलीस वर्दीत महेकला सीनिअर पोलीस इन्स्पेक्टरचा चार्ज दिला. यावेळी महेकनं भाईवाडा पोलीस स्टशेनमध्ये दाखल झालेल्या केसेसविषयी विचारण केली. त्यानंतर तिचा वाढदिवस चक्क पोलीस स्टेशनमध्येच साजरा करण्यात आला. हाडांचा म्हणजे बोन मॅरो कॅन्सर झालेल्या महेकचं पोलीस सेवेत जाण्याचं स्वप्न होतं. ते आज पूर्ण झाल्याचा आनंद तिच्या चेहर्‍यावर दिसत होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close