काँग्रेसच हायटेक ऑफिस वादाच्या भोवर्‍यात

September 15, 2009 10:46 AM0 commentsViews: 1

15 सप्टेंबर मुंबई प्रदेश काँग्रेसने मुंबईतल्या आझाद मैदानावर उभारलेलं हायटेक 'राजीव गांधी भवन' या नव्या ऑफिसच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेली एफएसआयबाबतची परवानगी घेतली नाही, असं महापालिकेच्या अधिकार्‍यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे ऑफिस वादाच्या भोवर्‍यात सापडलं आहे. काँग्रेसच्या या हायटेक ऑफिसचं उद्घाटन सोमवारीच सोनिया गांधींनी केलं होतं. पण 60 वर्षांच्या या जुन्या ऑफिसचं नूतनीकरण करताना काँग्रेसनं महापालिकेची परवानगीच घेतलेली नाही. तर यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली होती, असा दावा मुंबई काँग्रेस प्रवक्ते निजामुद्दीन राईन यांनी केला आहे.

close