तडीपारीचा प्रस्ताव असलेल्या मंगलदास बांदलला भाजपची उमेदवारी

September 15, 2009 10:49 AM0 commentsViews: 53

15 सप्टेंबर भाजपाने पुणे जिल्ह्यातल्या शिरूर विधानसभा मतदारसंघातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मंगलदास बंादल याला उमेदवारी दिली आहे. पुण्यात एका पत्रकार परिषदेत या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. बांदलवर खंडणीसाठी अरिहंत कंपनीच्या मालकाला धमकावणे, मारामारी, तसेच ऍट्रोसिटी कायद्यांतर्गत दलित महिलेला धमकावण्याचा एक गुन्हा यासारखे गुन्हे नोंदवले आहेत. विशेष म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीत बांदलला तडीपार करण्याचा पोलिसांचा प्रस्ताव आहे. मात्र राजकीय सुडापोटी राष्ट्रवादीने आपल्यावर गुंडगिरीचे आरोप केले आहेत असा दावा बांदलनं केला आहे.

close