उत्तर भारतीयांनाही महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्त्व हवं- संजय निरुपम

September 15, 2009 10:52 AM0 commentsViews: 2

15 सप्टेंबर उत्तर भारतीयांनाही महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधित्त्व मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी त्यासाठी आपण जोरदार प्रयत्न करणार असल्याचं काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी म्हटलय. नागपुरात हिंदी भाषिक संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. तेव्हा निरुपम यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमात उत्तर भारतीयांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. मुंबईमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत असल्यानेच उत्तर भारतीय संघ निर्माण केला, असंही निरुपम म्हणाले. ठाणे, कल्याणसारख्या भागाबरोबरच पुण्यातही मोठ्या संख्येनं उत्तर भारतीय आहेत. त्यामुळे उत्तर भारतीयांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावं अशी अपेक्षा निरुपम यांनी व्यक्त केली आहे.

close