जागावाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली संयुक्त बैठक मंगळवारी मुंबईत

September 15, 2009 10:54 AM0 commentsViews: 1

15 सप्टेंबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अखेर मुहूर्त सापडला आहे. निवडणुकीच्या चर्चेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पहिली संयुक्त बैठक मंगळवारी मुंबईत होत आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर रात्री 8 वाजता ही बैठक होणार आहे. त्यात कॉँग्रेसकडून मुख्यमंत्री चव्हाणांबरोबरच सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, माणिकराव ठाकरे आणि नारायण राणे उपस्थित असतील. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, गोविंदराव आदिक , छगन भुजबळ, आर. आर. पाटील आणि अजित पवार हे 5 नेते या संयुक्त बैठकीला उपस्थित राहतील. दरम्यान निवडणुकांच्या संदर्भातच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची मंगळवारी दिल्लीत बैठक झाली.

close