‘कांगारूं’पुढे ‘गोर्‍यासाहेबां’नी टाकली नांगी, 111 रन्सने पराभूत

February 14, 2015 8:54 PM0 commentsViews:

aus win14 फेब्रुवारी : वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान मेगामुकाबला रंगला. ऑस्ट्रेलियानं कांगारूंपुढे गोर्‍यासाहेबांनी अक्षरश: लोटांगण घालत पराभव स्वीकारलाय.ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा 111 रन्सनं धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियानं इंग्लंडसमोर विजयासाठी 9 विकेट गमावत 343 रन्सचं बलाढ्य आव्हान उभं केलं होतं.

टॉस जिंकून इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला पहिली बॅटिंग दिली. पण सुरुवातीलाच कांगारूंना दणके बसले. वॉर्नर 22 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. तर वॉटसन 0 आणि स्मिथ 5 रन्सवर झटपट आऊट झाले. पण त्यानंतर आलेल्या कॅप्टन बेलीनं ऍरॉन फिंचबरोबर ऑस्ट्रेलियाची इनिंग सावरली. फिंचनं तुफान खेळी करत आणि संयमी बॅटिंग करत शानदार सेंच्युरी ठोकली. फिचनं 128 बॉल्समध्ये 3 सिक्स आणि 12 फोर मारत 135 रन्स केले. तर कॅप्टन बेली आणि ग्लेन मॅक्सवेलनंही शानदार हाफ सेंच्युरी ठोकल्या. इंग्लंडतर्फे स्टीव्हन फिननं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. पण इंग्लंडची बॅटिंग आज सपशेल फ्लॉप ठरली. जेम्स टेलरचा अपवाद वगळता त्यांचा एकही बॅट्समन मोठा स्कोर करू शकला नाही. टेलरनं 98 रन्स केले. पण त्यानंतरही इंग्लंडला कमाल करता आली नाही आणि ऑस्ट्रेलियानं दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल मार्शनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close