शाहरुखच्या ‘मन्नत’बाहेरच्या रॅम्पवर हातोडा

February 14, 2015 6:07 PM0 commentsViews:

srk mannat14 फेब्रुवारी : बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर बांधण्यात आलेला अनधिकृत रॅम्पवर अखेर पालिकेचा हातोडा चाललाय. आज महापालिकेच्या अतिक्रमणाविरोधी पथकाने कारवाई सुरू केलीये.

वांद्रे येथील शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर व्हॅनिटी व्हॅन पार्क करण्यासाठी रस्त्यालगत रॅम्प बांधण्यात आलाय. या रॅम्पविरोधात खासदार पुनम महाजन यांनी पालिकेला पत्रव्यवहार केला होता. त्यांनंतर पालिकेनं आज सकाळी 8 वाजेपासून कारवाईला सुरूवात केली. शाहरूखच्या मन्नत बंगल्याशेजारच्या रस्त्यावर सिमेंटचा एक अनधिकृत रॅम्प बांधला होता. शाहरूखला 7 दिवसांपूर्वी हा अनधिकृत रॅम्प तोडण्यासाठीची नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र ते तोडण्यात आले नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई करत हा रॅम्प तोडण्यास सुरूवात केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close