भारताचा श्रीलंकेलर दणदणीत विजय

September 15, 2009 11:06 AM0 commentsViews: 5

15 सप्टेंबर ट्राय सीरिजच्या फायनलमध्ये भारतानं यजमान श्रीलंकेचा 46 रन्सनी पराभव करत कॉम्पेक कपवर आपलं नाव कोरलं आहे. सचिन तेंडुलकरने केलेल्या 138 रन्सच्या जोरावर भारतानं 319 रन्सचा डोंगर उभा केला. या टार्गेट समोर खेळणार्‍या श्रीलंकेची टीम 273 रन्सवर ऑलआऊट झाली. कंदम्बी आणि कपु-गेदरानं केलेल्या झुंजार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 70 रन्सची पार्टनरशिप केली. पण कपुगेदराला रैनानं आऊट केलं आणि पुन्हा एकदा भारतानं मॅचमध्ये कमबॅक केलं. यानंतर पुन्हा एकदा हरभजन सिंग मदतीला धावून आला. त्यानं एकाच ओव्हरमध्ये लागोपाठच्या बॉलवर कंदम्बी आणि लसिथ मलिंगाला आऊट करत भारताचा विजय निश्चित केला. कंदम्बीनं 66 रन्सची शानदार खेळी केली. त्याआधी तिलकरत्ने दिलशान आणि सनथ जयसुर्यानं तुफान फटकेबाजी केली आणि सातव्या ओव्हरमध्येच टीमला पन्नास रन्सचा आकडा गाठून दिला. यानंतर भारतीय कॅप्टन धोणीनं बॉल हरभजन सिंगच्या हातात दिला. हरभजननं दिलशानला क्लिन बोल्ड केलं. त्यानेचं जयवर्धनेलाही पॅव्हेलिअनमध्ये पाठवलं. यानंतर श्रीलंकेचे इतर बॅटसमन मैदानावर फार काळ टीकू शकले नाहीत. हरभजननं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. सचिन तेंडुलकर हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तर मॅन ऑफ द सिरीजही सचीनलाच देण्यात आली.

close