आरे कॉलनीमध्ये झाडं वाचवण्यासाठी नागरिकांचं चिपको आंदोलन

February 15, 2015 12:46 PM0 commentsViews:

R. A coloney

15 फेब्रुवारी :  मुंबईतील तिसर्‍या टप्प्यातल्या ‘मेट्रो-3′ साठी आरे कॉलनीतील 2 हजारपेक्षा जास्त झाडं तोडण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात काही पर्यावरणप्रेमींनी आता आवाज उठवला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमींनी चिपको आंदोलन सुरू केलं आहे.

मुंबईत चांगली घनडाट झाडे असलेलं अगदीच मोजके भाग आहेत. त्यामुळे आरे कॉलनीतील झाडं तोडली जाऊ नये अशी ‘सेव्ह आरे कँपेन’च्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. यावेळी आरे कॅम्पेनच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करत या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. झाडांचे पुर्नरोपण होण्याचं प्रमाण आपल्याकडे फारच कमी असल्यामुळे पुर्नरोपणावर आपला विश्वास नसल्याचं या कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close