सर्वच एअरलाईन्सच्या भाड्यात 50% डिस्काऊंट

September 15, 2009 1:23 PM0 commentsViews: 1

15 सप्टेंबर सर्वच एअरलाईन्सनी आपले प्रवास दर 50 टक्क्यांनी कमी केले आहेत. ही ऑफर तीन दिवसांसाठी आहे. 16, 17 आणि 18 सप्टेंबर या तीन दिवसांसाठी एअरलाईन्सचं भाडं पन्नास टक्के कमी असणार आहे. जेटने वैमानिकांच्या संपानंतर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी 3 दिवस 50 टक्के डिस्काऊंट जाहीर केला होता. त्यानंतर इतर विमान कंपन्यांनीही जेटचं अनुकरण केलं आहे. जेटचा संप सुरु असताना इतर एअरलाईन्सनी मात्र प्रवाश्यांकडून चौपट भाडं आकारलं होतं.

close