काश्मिरी मुली IBN लोकमतमध्ये

February 15, 2015 4:59 PM0 commentsViews:

15 फेब्रुवारी :  जम्मू आणि काश्मीर मध्ये निराधार मुलांसाठी काम करणारया बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या मुली सध्या मुंबई भेटीवर आहेत. त्यांनी नुकतीच आयबीएन लोकमतच्या आफिसला भेट दिली आणि न्यूजरूम मध्ये कामकाज कसं चालतं याची माहिती घेतली. या ग्रुप मधल्या बहुतेक मुली पहिल्यांदाच काश्मीर खोर्‍याबाहेर पडल्या आहेत. महाराष्ट्रातले तरूण सामाजिक कार्यकर्ते अधिक कदम गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमध्ये या संस्थेच्या माध्यमातून काम करत आहेत, दहशतवाद्यांच्या हल्ल्यातल्या पीडीत मुलांच्या पुनर्वसनाचं काम ही संस्था करते. आपल्या राज्यात गेल्यावर व्यवसाय सुरू करून स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी या ग्रुप मधल्या काही मुलींनी पुण्यात प्रशिक्षणही घेतलंय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close