राहुल गांधींनी वाचवले 445 रुपये

September 15, 2009 1:26 PM0 commentsViews: 2

15 सप्टेंबर राहुल गांधी यांनी लुधियानात युवा काँग्रेसच्या ट्रेनिंग कँपला हजेरी लावली. लुधियानापर्यंतचा प्रवास मात्र त्यांनी विमानाऐवजी रेल्वेनं केला. शताब्दी एक्सप्रेसनं राहुल लुधियानाला गेले. इतकंच नाही तर त्यांनी एक्झिक्युटिव्ह क्लासऐवजी चेअर क्लासनं प्रवास केला. या प्रवासात त्यांचे 445 रुपये वाचले. त्यांच्यासोबत विशेष सुरक्षा दलाचे जवान होते. राहुल यांना आपल्या शेजारी पाहून रेल्वे प्रवासी आश्चर्यचकीत झाले. सोनिया गांधी यांनी सोमवारी मुंबईपर्यंत विमान प्रवास बिझनेस क्लासऐवजी इकॉनमी क्लासने केला होता. आई सोनिया गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनीही युपीएच्या खर्चकपात योजनेत भाग घेतला आहे.

close