तिसर्‍या आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

September 15, 2009 1:28 PM0 commentsViews: 12

15 सप्टेंबररिपब्लिकन- डावी लोकशाही आघाडीने मुंबईत मंगळवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. तिसर्‍या आघाडीने प्रचारसभेपाठोपाठ जाहीरनामा प्रसिद्ध करण्यातही आघाडी घेतली आहे. आघाडीनं जाहीरनाम्यात शेतकर्‍यांसाठी भरघोस आश्वासनं दिली आहेत. शेतकर्‍यांना दर हेक्टरी दहा हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. जमिनी नियमित करणार, शहरी, ग्रामीण जनतेला नियमित पाण्याची हमीही त्यांनी दिलीय. कोरडवाहू शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज, बागायती शेतकर्‍यांना 4 टक्के दराने कर्ज देण्यात येणार आहे. मागेल त्याला वीज कनेक्शन, शेतमजूरांना 200 रुपये किमान वेतन, ग्राम रोजगार सेवकांना 5 हजार रुपये मानधन, शेतमजूर पुरूषांना 55 व्या वर्षी, महिलांना 50 व्या वर्षी पेंशन, 2009 पर्यंतच्या झोपड्या नियमित करणार अशी आश्वासनं जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.

close