आपल्याकडे फटाके फुटले, पाकिस्तानात टीव्ही !

February 15, 2015 9:32 PM0 commentsViews:

pak tv15 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तान मॅच म्हणजे दोन्ही देशातील क्रिकेट प्रेमींसाठी जीव की प्राण अशीच असते. आज भारताने सलग सहाव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली. त्यामुळे साहजिकच भारतात दिवाळी साजरी झाली परंतु दुसरीकडे पाकिस्तानात शिमगा साजरा झालाय. पाक क्रिकेटप्रेमींनी तर आपला राग टीव्हीवर काढला असून टीव्हीच फोडून टाकले आहे.

पाकिस्तानची राजधानी कराचीमध्ये संतप्त पाकिस्तानी चाहत्यांनी रस्त्यांवर टीव्ही सेट्स फोडले. ज्या क्रिकेटवर अतोनात प्रेम केलं त्याच बॅटने क्रिकेटप्रेमींनी टीव्ही फोडून टाकले. त्यांचा संताप एवढ्यावरच थांबला नाही. चाहत्यांनी पाकिस्तानी खेळाडूंविरोधात घोषणाही दिल्या.

पाकिस्तानी टीम भारताविरोधात वर्ल्ड कपमध्ये कधीही जिंकलेली नाही. त्यामुळेच चाहत्यांचा राग अनावर झाला.आमची टीम हरली, त्यांनी आमची मन तोडली. यापुढे आम्ही मॅच पाहणार नाही असं सांगत क्रिकेटप्रेमींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close