उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं- मनोहर जोशी

September 15, 2009 1:31 PM0 commentsViews: 5

15 सप्टेंबर उद्‌धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. गुहागरची जागा आम्हालाच हवी, असंही त्यांनी सांगितलं आहे. गुहागरच्या जागेवरून सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांना गुहागरमधून निवडणूक लढवायची आहे. युती ही फक्त सेना भाजपची आहे. त्यात मनसेला जागा नाही. शिवसेना एकटी जरी लढली तरी चांगल्या जागा मिळतील. पण मित्राला वाईट दिवस आले तरी त्याला आम्ही विसरणार नाही, असंही जोशी यांनी स्पष्ट केलंय.

close