मोदी-पवारांच्या भेटीवर राज ठाकरेंचे फटकारे

February 16, 2015 9:14 AM2 commentsViews:

raj on modi and pawar news

16 फेब्रुवारी : शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे बारामतीमध्ये एकाच मंचावर एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. राज ठाकरे यांनीही पुन्हा आपल्या कार्टूनच्या माध्यमातून मोदी आणि पवार यांच्या भेटीवर टीका केली आहे.

व्हॅलेंटाईन डे अर्थात 14 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी यांनी बारामतीत आप्पासाहेब पवार सभागृहाचं उद्घाटन करताना शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी पवारांचे तोंडभरून कौतुक केलं होतं.  या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटले आहे.

त्यामध्ये पवार आणि मोदी एकमेकांना घास भरवत असल्याचे चित्र असून, त्यामध्ये मराठी जनता भोळीभाबडी आणि विसरभोळी असल्याचे सांगत त्यांनी मोदी आणि पवारांच्या पंगतीला बसू नये, असा सल्ला संघाचा कार्यकर्ता सामान्य जनतेला देत आहे, अशा आशयाचं हे कार्टून आहे. या कार्टूनमध्ये राज ठाकरेंनी संघ परिवाराच्या झालेल्या या गोचीबाबतही मिश्किल चिमटे काढले आहेत. त्याचबरोबर मोदी-पवारांच्या भेटीमुळे संघ परिवाराचा झालेला त्रागाही टिपण्यात आला आहे.

याआधी दिल्लीत ‘आप’च्या विजयामुळे भाजपच्या झालेल्या पराभवावरही राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून भाष्य केलं होतं, त्यानंतर भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली होती. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Abhijit

    Raj saheb vyangachitra changli kadhtat… tyanna janatene aarsa dakhvla aahe… nidan tyat baghun MNS che ekhada vyangachitra kadhayla jamty ka te pahav… te jast changla hoil..

  • Archana

    @Abhijit-raj saheb full time cartoonist jhale tar bjp che supportes na ghari basave lagel karan tond dakhavayal jaga rahnar nahi nusati 2 vyangachitra kadhali tar evadhe bitharale

close