आयसिसकडून इजिप्तमधल्या 21 ख्रिश्चन नागरिकांचं शिरकाण

February 16, 2015 10:36 AM0 commentsViews:

B96fPw4CIAAbYT0

16 फेब्रुवारी :  आयसीस या दहशतवादी संघटनेची हिंसक कृत्ये अजूनही सुरूच असून, काल (रविवारी) आयसिसच्या ताब्यात असलेल्या इजिप्तमधील 21 ख्रिश्चन नागरिकांची हत्या केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

आयसिसच्या या कृत्याची दखल घेत इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह एल-सिसी यांनी सुरक्षा प्रमुखांची बैठक बोलावली आहे. इराक आणि सीरियामध्ये हिंसक कारवाया करत असलेल्या इसिसने लीबियामध्ये हे कृत्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका समुद्रकिनारी अपहृत 21 ख्रिश्चन नागरिकांची हत्या केली आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात लीबियातील सिरते शहरातून या सर्वांचं अपहरण करण्यात आलं होतं. हे 21 नागरिक इजिप्तच्या कॉप्टिक ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजाचे असल्याचं आयसिसनं म्हटलं आहे. काळे कपडे घातलेले आयसिसचे अतिरेकी अपहरण केलेल्या नागरिकांच्या पाठीमागे उभे असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

इजिप्त सरकारने आयसिसने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये तथ्य असल्याचं म्हटलं आहे. इजिप्तचे अध्यक्ष सिसी यांनी सात दिवसांचा दुःखवटा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी दहशतवादाविरोधात आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. इजिप्तच्या नागरिकांना लीबियामध्ये जायला आम्ही बंदी घात असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close