ज्येष्ठ हार्मोनियम वादक अप्पा जळगावकर यांचं निधन

September 16, 2009 8:53 AM0 commentsViews: 29

16 सप्टेंबर अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ गायकांच्या मैफिलींना आपल्या जादूई बोटांनी हार्मोनियमची साथ देणारे अप्पा जळगावकर यांचं पुण्यात वार्धक्यानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. हार्मोनियमधून मनस्वी सूर काढणारे अप्पा जवळपास सगळ्याच संगीतकारांचे आवडते कलाकार होते. साथसंगत असो की सोलो वादन, अप्पांनी रसिकांना कायम खिळवून ठेवत. आपल्या सुरांनी डोलायला लावलं, विशेषत: शास्त्रीय मैफिलींना अप्पा संगतीला असले की पंडित भीमसेन जोशींपासून ते पं. जसराज, किशोरी अमोणकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ गायक -गायिका निर्धास्त असत. एवढा अप्पांवर सगळ्यांचा विश्वास होता. त्यांना 1999 चा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

close