आर.आर.पाटील यांची राजकीय कारकीर्द

February 16, 2015 5:39 PM2 commentsViews:

r r patil 16 feb16 फेब्रुवारी : हजरजबाबी, उत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू आबा…अर्थात आर.आर.पाटील आणि महाराष्ट्राचे लाडके आबा… आज आपल्यात नाहीये. आबांनी चटका लावणारी एक्झिट घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीये. आबांच्या निधनामुळे महाराष्ट्र स्तब्ध झाला. डान्सबार बंदीचा निर्णय असो अथवा गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागाचं पालकतत्व असो अशी अनेक धाडसी भूमिका आबांनी पार पडली.

आर.आर.पाटील यांची राजकीय कारकीर्द

पूर्ण नाव- रावसाहेब रामराव पाटील
जन्म – 16 ऑगस्ट 1957
मूळगाव – अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली

1979 – सर्वप्रथम जि.प. सदस्य म्हणून निवड
1990 – तासगावचे आमदार म्हणून निवड
1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014 असे सलग 6 वेळा तासगावचे आमदार
1996 – काँग्रेसचे विधानसभा प्रतोद म्हणून नियुक्ती
1998 – विधानसभा लोकलेखा समितीचे अध्यक्ष
1999 – ग्रामविकास मंत्री
2004 – गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री
2008 – मुंबई हल्ल्यावेळी वादग्रस्त विधानामुळे मंत्रिपद गमावलं
2009 – दुसर्‍यांदा गृहमंत्रिपदी नियुक्ती
2004, 2009 – राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं

धडाकेबाज निर्णय

- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवलं
– महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवलं
– डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला आणि अंमलबजावणी केली
– डान्सबार बंदीच्या निर्णयावर टीका होऊनही आबा ठाम राहिले
– नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं
– आदिवासींच्या मुलांना दत्तक घेऊन मुख्य प्रवाहात आणलं
– गडचिरोलीच्या विकासकामांना चालना दिली

आबांचं वेगळेपण

- राजकीय पार्श्वभूमी नसूनही उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल
– पश्चिम महाराष्ट्रातले नेते असूनही एकही सहकारी संस्था नावावर नाही
– एक संवेदनशील राजकीय नेता अशी ओळख
– शरद पवारांचा विश्वासू पाठीराखे
– जि.प. सदस्य ते उपमुख्यमंत्री असा खडतर प्रवास
– राष्ट्रवादीचा स्वच्छ, सोज्ज्वळ चेहरा
– मोठ्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही
– उत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Afroz

    It’s February 16, 2015 date today. The News about R.R Patil telecasting right now said it’s 17…. Why????????????

  • Sachin Khude

    महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे राज्याचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या निधनामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आबा अजातशत्रू व्यक्तिमत्व, ग्रामीण महाराष्ट्राचा खरा चेहरा होते. विद्वत्ता, प्रामाणिकपणा, निष्ठा, विनम्रता आणि उत्तम वक्तृत्व हे त्यांचे गुण होते. एक संवेदनशील आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. लोकांच्या सुख-दुःखाशी समरस होणारे …आबा झुंजार आणि लढाऊही होते. विरोधकांचे हल्ले सभागृहात आणि सभागृहाबाहेर लीलया परतवण्याचे त्यांचे कसब वाखणण्याजोगे होते. ग्रामस्वच्छता आणि तंटामुक्ती या त्यांच्या योजनांमुळे ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र बदललं. डान्सबार बंदीचा निर्णयही त्यांनी घेतला होता. आदरणीय शरद पवार आणि पक्षाने दाखवलेला विश्‍वास त्यांनी प्रत्येक वेळी सार्थ करून दाखवला. ते आमच्या सदैव आठवणीत राहतील आणि राजकारणातील नवीन पिढीसाठी त्यांचे कार्य नेहमीच आदर्श ठरेल.

close