रामदास आठवलेंमुळे रिडालोसचं ऐक्य धोक्यात- राजेंद्र गवईं

September 16, 2009 8:57 AM0 commentsViews: 6

16 सप्टेंबर ' रामदास आठवले हे माझे आणि जोगेंद्र कवाडेंचे नेते असल्यासारखं वागत आहेत, आम्हाला न विचारता ते निर्णय घेतात, मीडियालाही परस्पर सामोरे जातात, सगळं श्रेय स्वत:च घेण्याचा प्रयत्न करतात ' असे आरोप रिडालोसचे संयोजक राजेंद्र गवई यांनी केले आहेत. जागावाटप आणि जाहीरनामा प्रसिद्ध करून राज्यातल्या तिसर्‍या आघाडीनं इतर पक्षांपेक्षा आघाडी घेतली. पण आघाडीतले प्रमुख भागीदार असलेल्या रिपब्लिकन पक्षांच्या गटांमधले मतभेद आता पुन्हा समोर येऊ लागले आहेत. हे असंच चालू राहिलं तर तिसर्‍या आघाडीचं ऐक्य धोक्यात येईल, असा इशाराही गवईंनी दिला आहे.

close