‘ होम मिनिस्टर ‘ मधून आदेश बांदेकर बाहेर

September 16, 2009 9:05 AM0 commentsViews: 125

16 सप्टेंबर शिवसेनेत गेलेले आदेश बांदेकर झी मराठी वाहिनीवरच्या 'होम मिनिस्टर' प्रोग्रॅममधून बाहेर पडले आहेत. आचारसंहितेमुळे आपण या प्रोग्रॅममधून बाहेर पडल्याचं बांदेकर यांनी सांगितलं आहे. बांदेकरांची ही भूमिका आता 'कॅम्पस अ फेअर वॉर' फेम जितेंद्र जोशी साकारणार आहे. शिवसेने तर्फे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. पण यामुळं घरी येऊन विरंगुळ्याचे चार क्षण देणारे आणि प्रेमानं भरजरी पैठणी भेट देणारे लाडके आदेश भावोजी तमाम टीव्ही चॅनल्सपासून दुरावणार आहेत.

close