काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपावर बैठक सुरु

September 16, 2009 9:35 AM0 commentsViews: 1

16 सप्टेंबर दोन्ही काँग्रेसनी आपापल्या स्वतंत्र बैठका घेतल्यानंतर , बुधवारी पुन्हा वर्षावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संयुक्त बैठक सुरू झाली. निवडणूकपूर्व आघाडी करण्याचा निर्णय मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला. पण कोणाला किती जागा सोडायच्या या फॉर्म्युल्यावर मंगळवारी एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळेच जागावाटपाबाबत बुधवारच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकतो. त्यामुळेच काँग्रेस किती जागांवर ताणतेय आणि राष्ट्रवादी किती जागांचा आग्रह धरतेय याबद्दल उत्सुकता आहे. तरीही राष्ट्रवादीसाठी 115 च्या आसपास जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला जाता आहे.

close