कॉम्पॅक कपच्या फायनलमधली सेंच्युरी राजसिंग डुंगरपूरांना समर्पित- सचिन तेंडुलकर

September 16, 2009 1:18 PM0 commentsViews: 4

16 सप्टेंबर कॉम्पॅक कपच्या फायनलमधली सेंच्युरी सचिन तेडुकरने राजसिंग डुंगरपूर यांना समर्पित केली आहे. भारतीय टीम श्रीलंकेत कॉम्पॅक कप खेळत असतानाच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांचं निधन झालं. भारतीय क्रिकेट जगतात राजभाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या डुंगरपूर यांनी क्रिकेट प्रशासक म्हणून आपल्या कारकीर्दीत कायम युवा क्रिकेटर्सना पाठिंबा दिला. त्यातला एक क्रिकेटर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर. श्रीलंकेहून मुंबईत परतल्या परतल्या डुंगरपूर यांच्या शोकसभेला सचिनने हजेरी लावली. सचिन रणजी क्रिकेटही खेळात नव्हता. तेव्हापासून राजभाईंनी त्याला पाठिंबा दिला होता. सचिन 14-15 वर्षांचा असताना इंग्लंडचा एक पंधरा दिवसांचा अभ्यास दौरा राजभाईंमुळेच शक्य झाला ही आठवण सचिनने सांगितली. तसचं डुंगरपूर यांच्या जाण्याने माझ वैयक्तीक नुकसान झाल्याचं सागंताना सचिन भावूक झाला. सचिनने 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं ते ही डुंगरपूर यांच्या पाठिंब्यानेच. डुंगरपूर तेव्हा राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष होते. इतक्या कमी वयातही तो पाकिस्तानच्या फास्ट बॉलर्सचा सामना करु शकेल असा विश्वास डुंगरपूर यांनी सचिनवर तेव्हा दाखवला.

close