छत्रपती शिवाजी महाराज भवनाचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

September 16, 2009 1:22 PM0 commentsViews: 5

16 सप्टेंबर राजधानी नवी दिल्लीत मंगळवारी एका शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज भवनाचं उद्घाटन केलं. छत्रपतींच्या कार्याची माहिती महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना व्हावी, महाराजांपासून प्रेरणा मिळावी, म्हणून दिल्लीतल्या कुतुब परिसरात एक एकर जागेवर या भवनाची प्रशस्त इमारत उभारण्यात आली आहे. इंदिरा गांधींच्या प्रेरणेने तीन दशकांपूर्वी स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी मेमोरियल राष्ट्रीय समितीने या भवनाची निर्मिती केलीआहे. उद्घाटन प्रसंगी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे उपस्थित होते. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या कार्यावर संशोधनही करण्यात येणार आहे. लवकरच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत लाईट ऍंड साउंड शोही सुरू होणार आहे.

close