समलिंगी संबधाना मान्यतेचा निर्णय सुप्रिम कोर्टाकडे- केंद्र

September 17, 2009 9:09 AM0 commentsViews: 3

17 सप्टेंबर केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टाच्या समलिंगी संबंधांना मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान न देण्याचं ठरवलं आहे. या बाबतचा अंतिम निर्णय सरकारनं सुप्रिम कोर्टावर सोडला आहे. तीन सदस्यांच्या समितीने हा निर्णय घेतला. यामध्ये गृहमंत्री पी.चिदंबरम, कायदा मंत्री वीरप्पा मोईली आणि आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांचा समावेश होता. कायदा मंत्र्यांनी या विषयासंबंधातला आपला अहवाल पंतप्रधानांना सादर केला आहे. समलिंगी संबंधाबाबतच्या कलम 377 वर 1 ऑक्टोबरला सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे.

close