काँग्रेस-राष्ट्रवादीत 174-114 चा फॉर्म्युला : घोषणा घटस्थापनेला

September 17, 2009 9:15 AM0 commentsViews: 2

17 सप्टेंबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसला जागावाटपाची यादी जाहीर करण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. येत्या शनिवारी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी दिल्लीत या जागावाटपाची अधिकृत घोषणा होईल. 174 आणि 114 असा जागावाटपाचा फॉर्म्युला दोन्हीही पक्षांना मान्य झाला आहे. पण अजूनही काही जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आणखी बैठका होणार आहेत. तर कांग्रेसची उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी शुक्रवारपासून काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीत बैठक सुरू होते आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला मंुबईत 6 जागा देण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे. पण प्रस्ताव मात्र चारच जागांचा दिला आहे. जागावाटपाच्या चर्चेत घासाघीस होऊन 2 जागा आणखी सोडण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे. वरळी, भांडूप, विक्रोळी, कुर्ला नेहरुनगर अशा या 4 जागांचा मूळ प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादीला दिला आहे. पण राष्ट्रवादीने फार ताणून धरल्यास मुलुंड आणि माहिम या दोन जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. गेल्या वेळेला राष्ट्रवादीनं मुंबईतून 7 जागा लढवल्या होत्या. पण यावेळी राष्ट्रवादीला मंुबईबाहेरची 1 जागा हवी आहे. तर मुख्यमंत्री अशोक चव्हाण भोकरमधून आणि आर.आर पाटील कवठेमहाकाळमधून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

close