एम एफ हुसेन यांचा 94 वा वाढदिवस

September 17, 2009 12:01 PM0 commentsViews: 6

17 सप्टेंबरजागतिक किर्तीचे चित्रकार एम. एफ. हुसेन यांचा गुरुवारी 94 वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये आर्टीस्ट कम्युनिटीतर्फे एम. एफ. हुसेन गॅलरीत एका खास शोचं आयोजन करण्यात आलं आहे. शंभर पेक्षा जास्त आर्टीस्ट आणि आर्ट स्टुडंटनी मिळून आपल्या विचारांमधले 94 वर्षातले एम. एफ. हुसेन साकारले आहेत. या शोची कल्पना छान आहे, तुम्ही आम्हाला भारतात परत हवे आहात ह्या भावना पोहोचवणारा हा हळूवार मार्ग आहे, असं मत आर्टिस्ट कंचन चंद्रा यांनी व्यक्त केलं. तर वीर मुन्शी म्हणाले हुसेन आमच्यासाठी खुप मोठी प्रेरणा आहेत, कारण ते प्रतिभावान आहेत. ते भारतात नाहीत म्हणून काही फरक पडत नाही. कारण ते कलेच्या निर्मीतीत आहेत. हा शो म्हणजे हुसेन यांच्यासाठी वाढदिवसाची भेट आहे. या शोमध्ये त्यांची फिल्म दिवसभर दाखवण्यात येणार आहे. चाहत्यांसाठी चित्रांचा खास कॅटलॉग तयार करण्यात आला आहे.

close