पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पाच जण ताब्यात

February 16, 2015 10:48 PM1 commentViews:

pansare 346316 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय. कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केलीये. या पाचही जणांची कसून चौकशी करण्यात येत आहेत. पण अजूनही काहीच धागेदोरे हाती आलेले नाहीत, असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय.

आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून परतत असताना ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोविंद पानसरे यांना एकूण तीन गोळ्या लागल्यात. त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्यात. त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. उमा पानसरे यांचीही प्रकृती स्थिर आहे. या लढवय्या नेत्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरांतून निषेध केला जातोय. दरम्यान, उद्या सकाळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कम्युनिस्ट कार्यकर्ते निषेध मोर्चा काढणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Amol

    दाभोलकर आणि पानसरे या दोन्हीही पुरोगामी विचारांच्या व्यक्तीवरील हल्या मधील साम्य पाहता या मध्ये १००% धर्मांध लोकांचा हात असणार. १५ दिवसापूर्वी पानसरे यांनी भाषांनामध्ये नथुराम गोडसे या खुन्याचा उल्लेख केला तेव्हा एका व्यक्तीने त्यासं विरोध केला होता. काही वर्षापूर्वी भगवा दहशतवाद सुरु असल्याचे पुरावे anti terrorist squad ला मिळाले होते. हि खूपच गंभीर बाब आहे. पुरोगामी विचारांच्या लोकांना संपवायचे खूप मोठे कटकारस्थान दिसते या मागे. रोज रोज जे लोक सनातनी वक्तव्य करत आहेत तेच याचे मुख्य सूत्रधार आहेत…फुले यांच्या विचारांचा पराभव करण्याचा हा प्रयत्न आहे….

close